नवी दिल्ली । केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचार्यांनी प्रवास भत्त्याचे व्हाऊचर (एलटीसी) आणि फेस्टीव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू करण्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने सरकारी कर्मचार्यांना एलटीसी कॅश व्हाऊचर आणि फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू करण्याचे जाहीर केले आहे. निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली. यात कर्मचार्यांना प्रवास भत्ता चे कॅश व्हाऊचर देण्यात येणार आहेत. हे व्हाऊचर कर्मचारी बाजारात खर्च करू शकणार आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. या स्कीमचा लाभ पीएसयू आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचार्यांना मिळणार आहे.
एलटीसीच्या बदल्यातील नकदी व्यवहार डिजिटल करता येणार आहे. हा एलटीसी २०१८-२१ या काळातील असणार आहे. याद्वारे ट्रेन किंवा विमान प्रवास केल्यास करमुक्त असणार आहे. यासाठी कर्मचार्याचे भाडे आणि अन्य खर्च तिप्पट असायला हवा. याचप्रकारे एखाद्या जीएसटी नोंद असलेल्या दुकानदाराकडून सामान डिजिटल पेमेंटने खरेदी केल्यास लाभ मिळणार आहे. अशाप्रकारे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्यांच्या खर्च करण्यामुळे २८ हजार कोटी रुपयांची रक्कम अर्थव्वस्थेत येणार आहे, असे सीतारामण यांनी सांगितले.
याचबरोबर यंदा सरकारी कर्मचार्यांसाठी फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू केली जाणार आहे. याद्वारे १०००० रुपयांची अॅडव्हान्स रक्कम सर्व प्रकारच्या सरकारी कर्मचार्यांना दिली जाईल. ही रक्कम ते १० हप्त्यांमध्ये जमा करू शकणार आहेत. ही स्कीम मार्च २०२१ पर्यंत उपलब्ध असणार आहे. ही रक्कम प्रीपेड रुपे कार्डद्वारे दिली जाणार आहे.