धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार यांनी आपल्या मशनरी तहसीलदारांकडे जमा केलेले आहेत, यापुढील त्यांना आधुनिक मशीन मिळण्याबाबत मागणी जळगाव जिल्हा सरकरमान्य रेशन दुकानदार संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारमान्य रेशन दुकान परवानाधारक महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हा सरकारमान्य रेशन दुकानदार संघटनेतर्फे शुक्रवार दि. १ एप्रिल रोजी रेशन दुकानदार आपले ई-पॉझ मशीन तहसिल कार्यालयात तहसिलदार यांच्याकडे जमा केलेले आहे. ई-पॉझ मशीनबाबत वर्षभरात वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा रेशन दुकानदारास सर्व्हर न मिळणे, इंटरनेट न मिळणे व इंटरनेट संबंधी अनुषंगिक बाबी शासनाकडून किंवा संबंधीत कंपनीकडून काहीच सुधारणा आजतागायत झालेली नाही. त्यामुळे रेशन दुकानदार व रेशन कार्डधारक ग्राहक यांच्यात टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. प्रसंगी ग्राहकांकडून टोकाची भूमिका, शिवीगाळ व दगडफेक या बाबींना रेशन दुकानदारास तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, रेशन दुकानदार कंटाळून आपले ई-पॉझ मशिनी तहसिल कार्यालयात ई-पॉझ मशीनची प्रेतयात्रा काढून जमा करण्यात आले. या ई-पॉझ मशिनीच्या व्यवस्थेत जो पर्यंत सुधारणा होत नाही तो पर्यंत ई-पॉझ मशिनी तहसिल कार्यलयात जमा ठेवण्यात येणार आहे. याप्रसंगी अध्यक्ष जमनादास भाटीया , कार्याध्यक्ष सुनील जावळेम उपाध्यक्ष शुभांगी बिऱ्हाडे, सचिव प्रशांत भावसार, आदी उपस्थित होते.