जळगाव प्रतिनिधी । जेवण करून शतपावली करत असतांना मोबाईलवर बोलत असलेल्या प्रौढाच्या हातातून धुमस्टाईल मोबाईल लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश भगवान सोनार (वय-४७) रा. साई मंदीराजवळ समता नगर, हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. १२ जानेवारी रोजी रात्री १०.४५ वाजता जेवण आटोपून शतपावली करण्यासाठी समता नगर ते संभाजी नगर रोडवर हातात मोबाईल घेवून पायी निघाले. ११ वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत असतांना संभाजी नगरकडून एका दुचाकीवर दोन जणांना अचानक येवून कानाला लावलेला मोबाईल हिसकावून दुचाकीने महाबळकडे पळाले. त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाही. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे.