नवी दिल्ली । वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा समजण्या पलीकडचा असल्याची खोचक प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी अतिशय संक्षिप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प खूप मोठा, समजण्या पलीकडचा आहे. इतर नेत्यांनी लांबलचक प्रतिक्रिया दिल्या असतांना डॉ. सिंग यांनी मात्र मोजक्या शब्दांमध्ये यावर चपखल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.