अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मूळच्या शहापूर येथील असलेल्या अरुणा विठ्ठल पाटील यांनी नुकतेच नाशिक येथे संपन्न झालेल्या सप्तकन्या या नाटिकेत भूमिका साकारली आहे.त्या अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय शाळेच्या माजी विद्यार्थीनी आहेत.
सप्तकन्या ही नाटिका नाशिक येथील भाभा नगर दादासाहेब गायकवाड सभागृहातपालक शिक्षक संघाच्या वतीने तसेच ग्लोबल टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांचा संयुक्तमाने नाशिकच्या कर्तृत्ववान सप्तकन्याही नाटिका सादर करण्यात आली. ही नाटिका प्रा.डॉ.विद्या चिटको यांच्या पुस्तकावर आधारित असून,सुप्रसिद्ध लेखिका डॉ,विनिता परांजपे यांनी याचे नाट्य रूपांतर केले आहे.
अरुणा पाटील यांनी या नाटिकेत समाजसेविका पात्र असलेल्या हिराबाई शिंदे यांची हुबेहूब भूमिका साकारली असून;नाशिक शहरात, या नाटिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.त्यात त्यांनी केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान कळमसरेच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विध्यार्थीनीमुळे शाळेचे नाव उंचावले गेल्याने मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच खास करून एकात्मता ग्रुपचे वर्गमित्र यांनी अरुणा पाटील यांचे विशेष कौतुक करीत अभिनंदन केले.