सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच महाराष्ट्रातील सरकार राहील, असा दावा माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणेंनी केला. तीन पक्षात एकमत नसल्याने हे सरकार चालणार नाही, असे भाकित त्यांनी वर्तवले आहे.
नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का?, या प्रश्नांचे उत्तर देखील दिले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकला सांगा? अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना उत्तर देत डिवचले आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चालू आहे, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.