सन्मित्र कॉलनी मित्र मंडळातर्फे अर्सेनिक अल्बम ३० होमीओपॅथी गोळयांचे १२० घरामध्ये वाटप

जळगाव प्रतिनिधी । येथील संन्मित्र कॉलनी मित्र मंडळातर्फे आज अर्सेनिक अल्बम ३० होमीओपॅथी गोळयांचे १२० घरांमध्ये वाटप करण्यात आले.

कोरोना आजाराचे थैमान सर्वत्र सूरू असतांना जळगाव शहरातील वाढती संख्या बघता गोरक्ष गाडीलकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव रेडक्रॉस सोसायटी व सामाजिक संस्थाच्या मदतीने प्रत्येक भागात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या ‘अर्सेनिक अल्बम-३०’ या होमीओपॅथी गोळयांचे आज संन्मित्र कॉलनी परिसरात वाटप करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष रमेश बाबुराव नेमाडे, उपाध्यक्ष दत्तात्रय हरी बारकरे यांचेसह कार्यकर्ते सामील झाले होते.यावेळी घरघरात जाउन या औषधीचा उपयोग व कशा प्रकारे ही औषधी घ्यावयाची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. जवळपास १२० घरामध्ये या औषधीचे वाटप करण्यात आले आहे. सन्मिंत्र कॉलनीत सध्या तरी कोरोनाचा शिरकाव नसल्याने पुढेही कोरोनाचा शिरकाव होउ न देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे अध्यक्ष रमेश नेमाडे यांनी सांगीतले.

Protected Content