सदाबाई रायसोनी कोविड केअर सेंटरची माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी केली पाहणी !

जळगाव (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्या सदाबाई रायसोनी हॉस्टेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जि.एम.फाऊंडेशन मित्र परिवारतर्फे कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. शनिवारी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

 

३०० पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी करताना माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्यासोबत महापौर सौ.भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, नंदू अडवाणी, अतुलसिंग हाडा, सुशील हासवाणी, मनोज काळे, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.

Protected Content