सत्तेच्या काळात शेतकरी वाऱ्यावर ; आता आमदार महाजनांकडून भूलथापांचा पाऊस

 

शेंदूर्णी : प्रतिनिधी । सत्तेत असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आमदार गिरीश महाजन आता शेतकऱ्यांवर पावसासारखा भुलथापांचा वर्षाव करीत आहेत , अशी घणाघाती टीका आज संजय गरुड यांनी केली .

येथील खरेदी विक्री जिनिंग सोसायटीच्या सीसीआयच्या कापूस व मका ज्वारी , भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन आवारात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व मार्केटिंग फेडरेशन माजी चेअरमन ऍड.रविंद्र पाटील यांचे हस्ते व शेंदूर्णी सहकारी फळ विक्री संस्थेचे अध्यक्ष संजय गरूड, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजन करून करण्यात आले

यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांनी सांगितले कि युती सरकारच्या काळात कापूस खरेदीसाठी खाजगी जिनिंगला प्राधान्य दिले तसेच ज्वारी, मका खरेदी केंद्र उद्घाटन करून दुसऱ्याच दिवशीं बंद केली जायची शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत होता तेव्हा माजी मंत्री व आताचे आमदार गिरीश महाजन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून होते आता शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते महाविकास आघाडीवर टीका करून शेतकऱ्यांना भूल थापा मारत फिरतांना दिसत आहेत आमदार महाजनांच्या भूलथापांना शेतकरी किंमत देत नसल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी ऍड रविंद्र भय्या पाटील यांनीही आमदार गिरीश महाजन यांची खिल्ली उडवली कापूस ट्रॅक्टरचे पूजन करून किसन बारी या शेतकऱ्याचा टोपी रुमाल देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी उत्तमराव थोरात, भागवत पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासक दिलीप पाटील, सचिव प्रसाद पाटील, संजय लोखंडे, राजेंद्र बिऱ्हाडे, सीसीआय ग्रेडर प्रदिप पाटील, मका खरेदी केंद्र ग्रेडर, मॅनेजर ज्ञानेश्वर पाटील, शांताराम दांडगे , माजी बाजार समिती सभापती दिलीप पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, तालुका युवक अध्यक्ष शैलेश पाटील ,शेंदूर्णी शहर राष्ट्रवादी अध्यक्ष श्रीराम काटे व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते,

त्याचप्रमाणे दि १७ रोजी शेंदूर्णी येथिल गोपाला जिनिंग व मालखेडा येथिल केसरी जिनिंग मध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती त्याला आजच्या कार्यक्रमात संजय गरूड यांनी उत्तर दिले

.शेंदूर्णी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन दगडू पाटील यांच्या कार्याचा सर्वच वक्त्यांनी गौरव केला पत्रकार अशोक जैन यांचा निवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार व्हाईस चेअरमन नंदकुमार बारी , संचालक गोपाळ गरूड, राजेंद्र चौधरी, अशोक औटे, भास्कर पाटील, दत्तात्रय पाटील, युवराज पाटील, सावजी चांभार यांच्यासह संचालकांनी केला

Protected Content