जळगाव, संदीप होले | जळगाव शहर महापालिकेत सत्तांतर घडवून आणत शिवसेनेची सत्ता आणण्यात आपण महत्वाची भूमिका पार पाडली आहे. यामुळे भाजपचे नगरसेवक प्रत्येक महासभेत याच प्रकारे अडसर निर्माण होत असल्याचा आरोप उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केला.
आज महासभेत गदारोळ झाल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना उपमहापौरांनी आपल्यावरील आरोपांचे खंडण केले. आपल्याकडून राष्ट्रगीताचा अवमान झालेला नसून सत्ता गेल्यामुळे भाजपचा हा रडीचा डाव असल्याची टीका देखील त्यांनी केली. दलित वस्ती निधी अंतर्गत मतदान प्रक्रियेत वाद झाला होता. हा विषय प्रशासनाकडून आला होता, यात टेंडर प्रक्रिया पार पडलेली आहे. टेक्नीकल सह दराबाबतचे पाकीट उघडले गेले असून संबधित मक्तेदाराला मक्ता देण्याबाबतची संविधा केवळ सभागृहाच्या माहितीसाठी देण्यात आलेली होती. श्री. पाटील यांनी कैलास सोनवणे यांचे नाव न घेता पुढे सांगितले की, जळगावकरांना कोण कुठे कोणाच्या दुकानदाऱ्या चालत आहेत हे माहित असल्याचे आरोप केला. माझ्यावरील आरोप सिद्ध होतील त्याच दिवशी मी माझा पदाचा राजीनामा देईल असे जाहीर आवाहन श्री. पाटील यांनी केले.