फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने तसेच वडोदा, करंजी, व लिधुरी या गावातील सेवाभावी नागरिकांच्या सहकार्याने तेथील गरजू कुटुंबांना धान्य तसेच संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन खारीचा वाटा उचलत गरिबांना दान केले. यामुळे काही दिवस का होईना पण गरिबांना आधार झाला आहे. महाराजांनी दान देण्यासाठी एक हात पुढे केला तर परिसरातील अनेकदा त्यांनी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री निधीत रक्कम दान दिली. यासोबत परिसरातील गावांमध्ये गरजू गरीब दीनदुबळ्यांना दान देण्यासाठी शेकडो हात पुढे आले आहेत. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने केलेल्या लॉकडाऊनमुळे संसाराची चाके थांबली आहेत. यात निराधार व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून समाजातील अनेक सेवाभावी संस्था तसेच नागरिक आपापल्या परीने सहकार्य करीत असल्याचे समाधान जनार्दन हरिजी महाराज व प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००