सचिन वझे अटक प्रकरणात मोठे षड्यंत्र : कंगना रणौत

 

मुंबई, वृत्तसंस्था  ।काही दिवसांपूर्वी अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. याप्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांना अटक करण्यात आली आहे. यास शिवसेना जबाबदार असून त्यांच्या विरोधात मोठे कारस्थान शिजत असल्याचा दावा कंगना रणौत यांनी ट्विटद्वारे केला आहे.

कंगना रणौत यांनी ट्विटमध्ये म्हटले आह की, माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं. माझ्याविरोधात आणखी २०० गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे. जय हिंद. अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं सचिन वाझे प्रकरणी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Protected Content