सकाळी आंदोलनात, दुपारी कोठडीत 

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बोदवड तहसील कार्यालयात तहसीलदार टोणपे, त्यांचा वाहनचालक, तलाठी आणि खाजगी पंटर असे चार जणांना वाळू वाह्तुक करताना अटकाव किंवा कोणतीही कारवाई करू नये यासंदर्भात तक्रारदाराकडून ८ हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली.

बोदवड येथील तक्रारदार वाळू वाहतूकदार असून 26 मार्च रोजी बोदवड तालुका हद्दीत सिंदी जवळ तक्रारदार यांचे डंपर तहसीलदार यांनी अडविले. जागेवरच त्यांच्याकडून 23 हजार रुपये वसूल केले. यावरून पडताळणी केली असता 26 मार्च रोजी अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे डम्पर सोडण्यात यावे यासाठी, 10 हजार रुपये आणि तलाठी पारिसे यांनी देखील दरमहा 3000 रुपये ची मागणी केली, आदि वाहनांवर कोणतीही कारवाई करू नये, यासाठी तहसीलदार टोम्पे आणि वाहन चालक 10 हजार रुपये लाचेची मागणी 30 मार्च रोजी केली. तडजोडीत तक्रारदाराकडून आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून बोदवडचे तहसीलदार योगेश्वर नागनाथराव टोम्पे, मूळ राहणार देगलूर, जिल्हा. नांदेड , शासकीय वाहन चालक अनिल रावजी पाटील,रा.चिखली,ता. बोदवड, मंगेश वासुदेव पारिसे, स्थानिक तलाठी यांचेसह खाजगी पंटर शरद समाधान जगताप व्यवसाय मजूरी, रा रुपनगर बोदवड या चारही जणांना आठ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

या कारवाईत तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, संजोग बच्छाव, स.फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, पो.ना.सुनील शिरसाठ, पो.कॉ. प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांनी सहभाग घेतला होता.

सकाळी आंदोलन दुपरून कोठडी
विशेष म्हणजे शुकवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय्य मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या समवेत काळ्या फिती लावून आंदोलनास बसलेल्या बोदवड तहसीलदार योगेश टोम्पे आंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर काही तासातच ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे,

Protected Content