जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । झारंखड राज्यातील पारसनाथ पर्वतराज येथील जैन समाजाचे श्रध्दास्थान असलेले “श्री सम्मेद शिखर जी” याला झारखंड राज्याने पर्यटनस्थळ म्हणून मंजूरी दिली आहे. दरम्यान पावित्र्य कायम राखण्यासाठी झारखंड राज्याने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी जळगाव येथील सकल जैन श्री संघाच्या वतीने बुधवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, झारखंड राज्यातील पारसनाथ पर्वत राज येथील ‘श्री सम्मेद शिखर जी’ हे जैन समाजाचे पवित्रस्थान आहे. या ठिकाणी जैन समाजाचे तिर्थकार परमात्मा, महात्मा, महापुरूष हे अहिंसाची शिकवण देवून समाजाला पुढे नेण्याचे काम करत आहे. श्री सम्मेद शिखर जी हे जैन समाजाचे श्रध्दास्थान आहे. दरम्यान झारखंड राज्याने या स्थळाला पर्यटन म्हणून मान्यता दिली. परंतू जैन समाजाने या निर्णयाला विरोध केला आहे. पर्यटन म्हणून या स्थळाला मंजूर दिल्याने याठिकाणी हॉटेल येतील. हॉटेल आले म्हणून मांसविक्री व खाने हा प्रकार आला, सोबत दारूविक्री देखील होवून शकते. त्यामुळे येथील पावित्र्य धोक्यात येणार आहे. झारखंड राज्याने घोषाीत केलेल्या पर्यटनस्थळाच्या निर्णयाला सकल जैन समाजाच्या वतीने विरोध केला जात आहे. शासनाने हा निर्णय तातडीने रद्द करावा व जैन समाजाच्या भावना न दुखवता श्री सम्मेद शिखर जी आता आहे तसेच राहू द्या अशी मागणी केली आहे.
याप्रसंगी सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलीचंद जैन, माजी मंत्री सुरेश जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, कार्याध्यक्ष कस्तूरचंद बाफना, राजेश जैन, ललित लोडाया, जितेंद्र चोरडीया यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.