धरणगाव,प्रतिनिधी | आपली संस्कार शील पिढी हीच आपली खरी संपत्ती असून , तेच आपले भावी आधार स्तंभ असल्याने, येणारी पिढी घडविण्याचे सक्षम पणे कार्य करणारी ही शाळा केवळ शाळा नसून एक विद्यापीठच असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. ते काल (दि. २६ ) रोजी झालेल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसमेलनात केले.
लिटिल ब्लॉसम स्कूलच्या वार्षिक स्नेहसमेलनाप्रसंगी खासदारांच्या पत्नी संपदा पाटील, धरणगाव न.पा.चे नगराध्यक्ष निलेश चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वरी कन्स्ट्रक्शनचे भगवान महाजन, नयन शेठ गुजराथी, मातोश्री कन्स्ट्रक्शनचे मोहन महाजन, मूकबधिर शाळेचे आर. डी. पाटील, चेअरमन दीपक जाधव, प्राचार्य ज्योती जाधव आदी उपस्थित होते. याप्रसंगी ज्ञानेश्वरी कन्स्ट्रक्शन चे भगवान महाजन यांनी शाळेला विशेष सहकार्य केले तर श्रीजिनिग चे नयन शेठ यांनी आर. ओ.चे पाणी फिल्टर मशीन घेऊन दिले. मातोश्री कन्स्ट्रक्शनचे मोहन महाजन यांनी मुलांना बक्षिसे देऊन शाळेला सहकार्य केले. या स्नेहसंमेलनात जीवनातील सुख दुःखाचे नऊ रस वर आधारित जीवन प्रसंग नृत्याच्या माध्यमातून २री ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सादर केले. तर नर्सरी, ज्युनिअर ,सिनियर के.जी. च्या मुलांनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमात वर्षभरातील विविध स्पर्धांना यशस्वी विद्यार्थ्यांचे आजी आजोबांचा सत्कार करण्यात आला. त्यात माजी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पी.जी.पाटील तर ज्येष्ठ डॉ.डी. पी. पाटील यांचा समवेश होता. प्रसंगी बेस्ट प्यारेंट अवॉर्ड, बेस्ट टीचर अवॉर्ड वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास पालक संघाचे ए.के.पाटील, गजानन साठे, दिनेश मेहर यांचे सहकार्य लाभले. सूत्र संचालन प्रतिभा चौधरी यांनी तर आभार बत्तुल मॅडम यांनी मानले.