यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधिकऱ्यांनी स्वतः या प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांचे स्वाब घेऊन शासनाचा आणि रुग्णांचा फायदा कसा होईल या कडे लक्ष देत यावल तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रात स्वॅब चाचणी घेण्याची स्वतःची व इतरांची मानसिकता तयार केल्यामुळे त्यांचे वरिष्ठ आरोग्य कार्यालय कडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या संदर्भात किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जे. टी. महाजन काॅलेज (फैजपूर) सभागृहात कोवीड१९या संदर्भात नुकतेच सभेचे आयोजन केलेले होते, या सभेत डॉ. मनिषा महाजन यांनी कोवीड- १९ च्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत जिल्हाधिकारी यांना बाधीत रुग्णांच्या प्रतिबंधित क्षेत्रातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचे त्याच प्रतिबंधीत क्षेत्रात स्वॅब घेऊन निदान करावे असे सुचविले होते त्यामुळे लोकांच्या वेळेची बचत होईल, रुग्णांवर येणारे सामाजिक दडपण दूर होईल, ने – आण करण्याच्या इंधनाच्या खर्चात बचत होईल, संशयीत रुग्णांच्या राहण्याचा, जेवनाचा ,औषधोपचार आदी खर्चात बचत होईल इतके फायदे लोकांना मिळु शकतात.
या अनुषंगाने दि ४ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे किनगाव बु च्या २८ व डोनगाव च्या २१ असे एकुण ४९ रुग्णांचे स्वॅब तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनिषा महाजन यांनी घेतले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अरुण निबाळे, श्रीमती उषा पाटील, प्रिया पाटील, निलेश पाटील, श्रीमती के. जी. इंगळे, रज्जाक देशपांडे, कुर्बान तडवी , विनायक किरंगे, आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले. लोकांना गावातच सेवा उपलब्ध झाल्याने या कार्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदचे सदस्य आर. जी.नाना पाटील यांनी कौतुक केले आहे.
त्यामुळे आता येथून पुढे प्रतिबंधित क्षेत्रात स्वाब घेण्याची सोय उपलबध झालेली असून लोकांनी घाबरून न जाता आजार बरा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि खाजगी डॉक्टरनी आपल्या कडील संशयित लोकांना सरकारी रुग्णालयात स्वाब देण्यासाठी प्रोसाहित केले पाहिजे असे आवाहन तालुका वैधकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वैद्यकीय आधिकरी डॉ. मनिषा महाजन यांनी केले आहे .