Home Cities जळगाव ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा (व्हिडिओ)

‘संविधान दिन’ उत्साहात साजरा (व्हिडिओ)

0
39

 

जळगाव, प्रतिनिधी । संविधान जागर समिती जळगाव यांच्या विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे व अमोल कोल्हे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

संविधान दिनानिमित्त मुकुंद सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य , समता ,बंधुता व न्याय यावर आधारित संविधाननिर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले व २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान भारताचे राष्ट्रपती यांना अर्पण करण्यात आले. संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली. भारत देश प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीप्रणित सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले असे ते म्हणाले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले . यावेळी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला सोनवणे , भावना जैन, प्रतिभा भालेराव ,मोना सपकाळे , श्रीकांत मोरे , किरण ठाकूर , ऋषिकेश जाधव , अमेय कुलकर्णी , भैय्या पाटील , गणेश गवळी , सौरभ बोरसे , संविधान जागर समितीचे भारत ससाणे, समाधान सोनवणे नाना मगरे ,गौतम सोनवणे ,आनंदा तायडे, यशवंत घोडेस्वार, माळी महासंघाचे अध्यक्ष शालिग्राम मानकर , प्रकाश महाजन , वसंत पाटील , मराठा सेवा संघाचे खुशाल चव्हाण, संजय पाटील, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, कलिंदर तडवी , सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे , आकाश सपकाळे , सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बागरे , अॅॅड. राजेश गोयर , बाबुराव वाघ, लिलाधर तायडे अशोका ब्रिगेडचे संजय तांबे, रमेश सोनवणे, कास्ट्राईबचे चंदन बिऱ्हाडे , वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे , फारुक शेख, फईम पटेल , गौतम सोनवणे, प्रल्हाद दाभाडे, आकाश सपकाळे, आदी विविध संघटना व संस्थांचे प्रतिनिधी तसेच संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/295135325126715/
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/941561263039007/


Protected Content

Play sound