पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील रमेश सोनवणे यांची संविधान आर्मीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक सांस्कृतिक आणि सर्व संविधानवादी तसेच सर्वांच्या उद्दिष्टांसाठी कटिबध्द असल्याने ही निवड केली आहे.
संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी नियुक्ती केली आहे. सामाजिक, राजकीय व इतर कामाकाजाचा स्थितीदर्शक अहवाल सादर करणे, तसेच संविधान आर्मी राष्ट्र संघटनेच्या नियम व अटी मान्य करुन भारतीय संविधान नुसार कायदा व सुव्यवस्था राखुन १३५ कोटी जनतेच्या सेवेसाठी व न्याय व हक्कासाठी तत्पर असणे. यासारखी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडावी म्हणून रमेश सोनवणे यांचेवर विश्वास ठेवत त्यांची संविधान आर्मीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल रमेश (छोटु) सोनवणे यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.



