संविधानिक अधिकारासाठी ओबीसीनी एकत्र येणाची गरज – महासचिव राम वाडीभष्मे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मंडल आयोगाने केलेल्या शिफारशींच्या माध्यमातून मिळालेल्या संविधानिक अधिकारासाठी ओबीसीनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने येत्या ९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे यांनी केले.

 

जळगाव जिल्हा आढावा बैठकीच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केले. पुढे ते म्हणाले की, चिंतन शिबिराचे उद्घघाटक मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे नातू प्रा. डॉ. सूरज मंडल हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ डॉ. प्रभाकर गायकवाड उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके आहेत. दरम्यान माहिती पुस्तिका व संकेतस्थळाचे (वेबसाईट) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील सूतगिरणी चौकातील रेडवेलवेट सभागृहात शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात ओबीसी, भटके विमुक्त जाती व जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी (शिक्षक-शिक्षकेत्तरसह सर्व) यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय दुट्टे, श्यामकांत रुले, प्रमोद दुट्टे, नितीन जंगले, राजेंद्र कपले, राजेंद्र दुट्टे, कांशीराम चिम, सुनील धोरण(कृषी), नितीन लोखंडे, रमेश सुरवाडे आदी उपस्थित होते.

Protected Content