जळगाव, प्रतिनिधी । भारतीय संविधान पायाजवळ ठेऊन संविधानाचा अपमान केलेल्या प्रतिनिधीचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, इंदापूर तालुका येथील विद्युत वितरण विभागाच्या कार्यक्रमात दि१४/०९/२०२१ रोजी भारतीय संविधानाचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला व पायाजवळ प्रत ठेऊन संविधानाची अवहेलना करण्यात आली. याचा आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव महानगर यांचेवतीने जाहीर निषेध करतो व त्या प्रतिनिधीवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करतो. नियोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खा.सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी सदरील कार्यक्रमामध्ये त्यांना भेट दिलेल्या संविधान प्रतीचा अनादर करण्यात आला. अशा महाविकास आघाडीच्या सरकार मधील नेते फुले, शाहू, आंबेडकर यांची नाव घेऊन पुरोगामी असल्याचा जो खोटा दावा करणाऱ्या या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव महानगर यांचेवतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहोत. निवेदनावर महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल, अनुसूचित जाती मोर्चा महानगराध्यक्ष लता बाविस्कर, माजी महापौर सीमा भोळे, भाजपा गट नेते भगत बालाणी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/399527448362674