संयुक्त राष्ट्रे : वृत्तसंस्था । दहशतवादाच्या मुद्यावर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर टीका केली.
लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महम्मदसारख्या दशहतवादी संघटना दंडमुक्ती आणि प्रोत्साहनासह कार्यरत आहेत, असे स्पष्ट करत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला लक्ष्य केले. अशा संघटनांना कोणीही थारा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. एस जयशंकर यांनी २००८ मध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी केलेला मुंबई दहशतवादी हल्ला, पठाणकोटमधील हवाई तळ आणि पुलवामा हल्ल्याची आठवण यावेळी आठवण करुन दिली.
“आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवाद्यांना कधीही आश्रय देऊ नये. पाकिस्तानवरवर टीका करत त्यांनी अशा दुटप्पी बोलणाऱ्यांचा पर्दाफाश करावा लागेल, जे अशा लोकांना सुविधा देतात आणि ज्यांचे हात निरपराध लोकांच्या रक्ताने माखलेले आहेत,” असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका’ या विषयावर उच्चस्तरीय बैठकीला जयशंकर यांनी संबोधित केले. “आमच्या शेजारच्या भागात, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हेंट – खोरासन अधिक शक्तिशाली बनले आहे आणि सतत आपल्या दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानमधील घडामोडींमुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेबाबत जागतिक चिंता वाढल्या आहेत. ते अफगाणिस्तानात असोत किंवा भारताच्या विरोधात असो, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या गटांना त्यांचा पाठिंबा आहे आणि ते निर्भयपणे आपले उपक्रम राबवत आहेत, असे जयशंकर यांनी म्हटले.
पाकिस्तानचे नाव न घेता, जेथे संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेले दहशतवादी आणि दहशतवादी गट कथितपणे सुरक्षित आश्रय घेतात आणि सरकारी मदतीचा फायदा घेतात असे जयशंकर म्हणाले. “ज्यांचे हात निरपराध लोकांच्या रक्ताने माखलेले आहेत त्यांना जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा त्यांचा दुटप्पीपणा उघड करावा,” असे जयशंकर म्हटले.
“दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला असलेला धोका’ या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील (यूएनएससी) चर्चासत्रात बोलताना एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका ठामपणे मांडली. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महम्मद या संघटना भारतासारख्या देशांविरोधात मोकाट कारवाया करत असतात. या संघटनांचे आदरातिथ्य केले जाते आणि त्यांना प्रोत्साहनही दिले जाते,” असे जयशंकर म्हणाले.
अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे स्वाभाविकच क्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर त्यांच्या परिणामांबाबतची चिंता वाढली आहे, याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले.