*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | शासनात विलिनीकरणाची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने एसटी कर्मचारी सुनील जाधव यांनी अन्नत्याग उपोषणाला १० मार्चपासून सुरुवात केली. त्याची यशस्वी सांगता शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली आहे.
चाळीसगावात एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या पाच महिन्यांपासून शासनात विलिनीकरण करावे यांसह विविध मागण्यासाठी संप सुरू आहेत. मात्र अद्यापही मागण्या पूर्ण होत नसल्याने सुनील जाधव या एसटी कर्मचाऱ्यांनी १० मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा वकील सदावर्ते यांनी ११ मार्च रोजी उच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडली. त्यात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या कार्यवाही रद्द करून भविष्यातही अशी कार्यवाही टाळावी अशी मागणी केली. त्यास उच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने एसटी कर्मचारी सुनील जाधव यांची अन्नत्याग उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली आहे. तत्पूर्वी आगार व्यवस्थापक यांनी उपोषणाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याचे सुनील जाधव यांनी सांगितले आहे. यामुळे तहसिलदार अमोल मोरे यांच्या सांगण्यावरून शहर पोलिस स्थानकाचे सपोनि सचिन कापडणीस व पोकॉ पवार यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आला आहे.