जळगाव,प्रतिनिधी । श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त निमखेडी शिवारातील साईनगर येथे ५१ झाडे लावुन संत सेना महाराज पुण्यतीथी साजरी करण्यात आली.
नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बंटी नेरपगार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून परीसरात ५१ झाडे लावण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी स्वामी समर्थ केंद्राचे पर्यावरण प्रतिनीधी वसंत पाटील म्हणाले की, येत्या काळामध्ये पृथ्वीवरील तापमान प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि ते जे ऊन असेल ते कोणाला ही सहन होणार नाही. त्याकरीता सर्व समाजातील लोकांनी संतांच्या पुण्यतिथीनिमित्त परीसरात वृक्षारोपण केले तर पृथ्वीवरील वाढणारे तापमान रोखण्यास मदत होईल व झाडांपासुन आपल्याला ऑक्सिजन मिळेल. साईनगर परीसरातील नागरीकांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले. या कार्यक्रमास नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बंटी नेरपगार, स्वामी समर्थ केंद्राचे पर्यावरण प्रतिनीधी वसंत पाटील, योगेश निकम, कुमार श्रीनामे, सुभाष खंबायत, संतोष निकम, विजय ठाकरे, दिनेश पाटील, चेतन देवरे, रामचंद्र कोळी, गणेश सावळे, संजीवनी निकम, सुनंदा निकम, वैशाली ठाकरे, शितल देवरे,शिवाजी ठाकरे, भैय्या वाघ, स्वप्नील सावळे आदी उपस्थित होते.