जळगाव, प्रतिनिधी । येथील जगतगुरु संत रोहीदास महाराज चर्मकार बहुद्देशीय संस्था, जळगावतर्फे शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
दरवर्षी मिरवणूक काढून संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी होते. यंदा मात्र कोरोना महामारीमुळे अत्यंत सध्या पद्धतीने जयंती साजरी झाली. घरगुती वातावरणात केवळ प्रतिमा पूजन करून संत रोहिदास यांच्या कार्याला स्मरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे यांनी प्रतिमा पूजन करीत माल्यार्पण केले. यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमांना पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करीत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपाध्यक्ष विजय खजूरे, सचिव दीपक मेथे, खजिनदार विजय अहिरे, महिला सदस्य लताबाई धोरे, नीलिमा धोरे, रेखाबाई अहिरे, सदस्य रविंद्र धोरे, महेंद्र मेथे, लखन झिरे, साहेबराव खजुरे, कैलास मेथे, छोटू धोरे, किशोर हिरे, भाईदास कासवे, राजू धोरे, विक्रम हिरे,सागर सपकाळे, सागर बेहेरे, दिलीप जिरे, पंडित धोरे, संतोष धोरे, सुनील वाघ, अनिल चंद्रे, अशोक बेरभैया, परमेश्वर अहिरे आदी उपस्थित होते. प्रेमराज शिंपी यांचे सहकार्य लाभले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/180445206900961