पहूर , ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ येथे जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते संत रुपलाल महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले .
नागवेली बारी समाज पंच मंडळाच्या नाम फलकाचे अनावरण आणि संत रुपलाल महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सरपंच नीता पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , रामेश्वर पाटील , राजू पाटील , सलीम शेख, शांताराम बारी , माधव बारी ,दिगंबर बारी , अर्जुन बारी ,रवी बारी , महेश पाटील , गणेश मंडलिक , प्रभाकर बारी , अशोक पाटील , शरद बेलपत्रे , संतोष चिंचोले , भिका मराठे , भारत पाटील यांच्यासह समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .