जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील जयकिसनवाडी येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते मंगळवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
संत गाडगेबाबा यांना अभिवादन केल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. महापौर म्हणाल्या की, संत गाडगेबाबा किर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधन करून नागरीकांमध्ये जनजागृतीचे काम करत होते. हातात झाडू घेवून ते स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यामुळे आज नागरीकांमध्ये स्वच्छतेचे महत्व समजले आहे. असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला जळगाव महापालिकेचे उपायुक्त चंद्रकांत वानखेडे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, कार्यालय अधिक्षक अविनाश बाविस्कर, शाखा अभियंता मनीष अमृतकर, महापौरांचे स्वीय सहाय्यक अशोक भारूउे, हेडमाळी सुरेश कोल्हे, वासुदेव सोनवणे, सुरेश ठाकरे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, सर्जेराव बेडीसकर, अरुण राऊत, राकेश वाघ, दीपक बाविस्कर, शंकर निंबाळकर, संदीप सोनवणे, भूषण सोनवणे, रमेश सूर्यवंशी मनपाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.