सूरत वृत्तसंस्था । भूजमधील गर्ल्स हॉस्टेलमध्ये मासिक पाळीचा पुरावा म्हणून तरूणींना विवस्त्र उभे करण्याचे प्रकरण शांत होत नाही तोच गुजरातमधीलच सुरत शहरात ट्रेनी महिलांची विवस्त्र चाचणी करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
सूरतमध्ये ट्रेनी क्लर्क पदावर काम करणार्या महिलांना निर्वस्त्र करत त्यांची जबरदस्तीनं स्त्री रोगसंबंधी वैद्यकीय चाचणीसह मफिंगर टेस्टफही घेण्यात आली. या अविवाहीत तरुणींना काही आक्षेपार्ह प्रश्नही विचारण्यात आले. सूरत म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडलीय. एमएमसी कर्मचारी संघानं पालिका अधिकार्यांकडे याबद्दल तक्रार दाखल केलीय. अनिवार्य फिटनेस टेस्टसाठी सूरत नगर वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेत या महिलांना बोलावण्यात आलं होतं. जवळपास १०० ट्रेनी कर्मचार्यांची वैद्याकीय तपासणी करण्यात आली. ट्रेनी महिलांना १०-१० च्या समुहात निर्वस्त्र उभे राहण्याचे आदेश देण्यात आले. महिलांना ज्या ठिकाणी निर्वस्त्र उभं करण्यात आलं होतं तो व्यवस्थित बंदही करण्यात आला नव्हता. या रुममध्ये केवळ एक पडदा लावण्यात आला होता. यादरम्यान, महिलांची वादग्रस्त फिंगर टेस्टही करण्यात आली. त्यांना काही खासगी प्रश्न विचारण्यात आले.
अलीकडेच भुजच्या सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्युटच्या हॉस्टेलमध्ये सॅनिटरी पॅड देण्यात आल्यानंतर महाविद्यालयाच्या ६८ तरुणींना प्राचार्यांसमोर मासिक पाळी चाचणीला सामोरं जावं लागलं होते. यामुळे खळबळ उडाल्यानंतर विद्यापीठाने एक समिती स्थापन करून याची चौकशी सुरू केली आहे. या पाठोपाठ सुरत शहरात याचीच पुनरावृत्ती घडल्याने संताप व्यक्त होत आहे.