फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | समरसता महाकुंभानिमित्त निष्कलंक धाम याठिकाणी संतांचे आगमन होणार असल्याने बुधवार दि. २८ डिसेंबर पासून संतांव्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
समरसता महाकुंभाच्या निमित्त दररोज परिसरातील नागरिक निष्कलंक धाम वढोदा येथे मोठ्या संख्येने कुटुंबासह बघण्यासाठी येत आहे. निष्कलंक धाम याठिकाणी संतांचे आगमन होणार असल्याने दि. २८ डिसेंबर पासून संतांव्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. दि. २९ डिसेंबरपासून नियोजित कार्यक्रम संपन्न होणार असल्याने सर्वांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे.