संजय राऊत खोटे बोलताय,सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत ; मामाचा खुलासा

पटना (वृत्तसंस्था) संजय राऊत खोटे बोलताय. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत, असा खुलासा सुशांतच्या मामाने केला आहे. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता.

 

सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते असा दावा राऊत यांनी सामनामधून केला होता. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर सुशांतचे मामा आर सी सिंग यांनी सांगितले की, सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चुकीचे विधान केले आहे. राऊत असे वक्तव्य करून प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. असे काहीतरी बोलून एखाद्याची प्रतिमा मलिन करणे ही चांगली बाब आहे का? बिहारमध्ये जे राहतात त्या सगळ्यांना माहिती आहे, की सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केले आहे, असे सिंग म्हणाले.

Protected Content