मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष झाला. यावर अखेर शिंदे गटाने ताबा मिळविला. यानंतर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, स्फोट करण्यासाठी शिवसेनेकडे दारुगोळा शिल्लक नाहीये. संजय राऊत बोलून दमले आहेत. त्यांच्या स्फोटातला दारूगोळा संपला असल्याची टिका गोगावले यांनी केली.
दरम्यान, राज्यात जिथेही शिवसेनेची कार्यालये असतील तिथे आमचा पक्ष दावा सांगणार असल्याचेही भरत गोगावले म्हणाले. तर, आपल्याकडे स्फोट करण्यासारखी अनेक प्रकरणं आहेत. सभागृहामध्ये आता सगळे विषय मांडणार आहे. पार्ल्यापासून ब्रांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते तुम्ही बघाच. बांद्रापासून पार्ल्यापर्यंत यांना फटाके वाजताना पाहायला मिळतील. यांचे अनेक घोटाळे आहेत. ही एक झलक आहे आणि झलक यांना पाहायला मिळेल असा इशारा देखील भरत गोगावले यांनी दिला आहे.