मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संजय राऊतांनी राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही काळापासून संजय राऊत आणि राणे कुटुंबीयांमध्ये टीका रंगल्या आहेत. हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. राऊतांकडून भाजपा आमदार नितेश राणेंना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली गेली असून येत्या ४ जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना कोर्टात आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
नितेश राणेंविरोधात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी देखील दावा दाखल केला होता. संजय राऊतांवर किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आदीच अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.