पाळधी, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत रोजगार मिळत नसल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना उपासमारसहन करावी लागत आहे. अशा गोरगरिबांना साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पाळधी यांच्यातर्फे धान्य वाटप करण्यात येत आहे.
श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज सुनील झंवर व सरपंच चंदूलाल कोळी यांनी गोरगरीब वस्तीत जाऊन गरजुंना किरणा घरपोच दिला. यावेळी त्यांनी सुमारे ७०० परिवारांना लॉक डाउन संपेपर्यंत पुरेल एवढे किराणा मालाचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा सुरू ठेवणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.