जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कल्पना पाटील व मिनल पाटील यांनी गरजुंना किराणा वाटप करून मदतीचा हात दिला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गरजू २०० गरीब कुटुंबांना किराणा मालाची मदत व्हावी म्हणून ५ किलो आटा, ३ किलो तांदूळ, १ किलो तुरडाळ, १ किलो तेल अशा वस्तूंचं पॅकेज करून वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. जेणेकरून काही कुटुंबांना याचा लाभ होईल. राज्य सरकार आपल्या पातळीवर सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात मदत करत आहे. पण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने सर्वसामान्य जनतेसाठी आपलं काहीतरी कर्तव्य असल्याचं मत महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील व कार्याध्यक्षा मीनल पाटील यांनी मांडलं. यावेळी जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या पत्नी अरुंधती पाटील तसेच लहानगी मुलगी समर्था आणि समर्थ यांनी ही मदत केली.