रावेर, प्रतिनिधी । रावेर शहरात प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगणे यांच्या हस्ते गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर करण्यात आले असून याकाळात रोजगार नसल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षांत घेऊन नगराध्यक्ष दारा मोहोम्मद यांच्यातर्फे आजपासुन धान्याची किट्स तयार करून शहरातील गरीब गरजु कुटुंबाना वाटप करण्यात येत आहे. याचा शुभारंभ प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगणे यांच्या हस्ते धान्यचे किट्स वाटप करून करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक आसिफ मोहोम्मद गयास शेख, अताउल्ला खान,सादिक मेंबर आदी उपस्थित होते.