भुसावळ , प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या संचारबंदीच्या काळात अनेक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडल्याने बाहेरगाव येथून भुसावळात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची मेस बंद असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या मदतीला मृत्युंजय मंडळाचे कार्यकर्ते सरसावले आहेत.
संचारबंदी असल्याने भुसावळ येथे शिक्षणासाठी आलेल्या यवतमाळ व अमरावती येथील २२ विद्यार्थ्यांची मेस बंद आहे. संचारबंदीच्या कालावधीत सर्वत्र मेस, हॉटेल बंद असल्याने या विद्यार्थ्यांची जेवणाची सोय होत नव्हती. या विद्यार्थ्यांचा रोजच्या जेवणाची सोय मृत्युंजय मंडळाने केली आहे. यात मंडळातर्फे बेसन पोळी, खिचडी, फोडणीचे वरण, आलू मटरची भाजी पोळी, शेवभाजी पोळी, बटाट्याची भाजी पोळी आदी मेनू सकाळ व संध्याकाळी देण्यात येत आहे.