पारोळा, प्रतिनिधी । संचारबंदी लागू असल्याने नगरपालिकेतर्फे सर्व प्रकारचे आवाहन करूनही बाजारातील नागरिकांची गर्दी कमी होत नाही. यामुळे बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी उद्यापासून प्रत्येक कुटुंबास अत्यावश्यक सेवेसाठी ओळखपत्र पास वाटप करण्यात येणार आहे.
नगरपालिकेतर्फे देण्यात येणारी पास प्रत्येक कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीस उपयोगात आणता येईल. फक्त त्याने बाजारात येताना ही पास सोबत ठेवावी, जेणेकरून पोलीस, प्रशासकीय कर्मचारी यापैकी कोणीही मागणी केल्यास ते दाखवून बाजार करता येईल. याचा हेतू एकच गर्दी कमी होणे व कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होणे असा असल्याचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी सांगितले.