जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रासह देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन वाढविण्यात आल्याने नाशिक येथे कामासाठी गेलेलं मध्य प्रदेशमधील मजूर पायी मध्य प्रदेशाला परत जात असतांना जिल्हा पेठ पोलिसांनी त्यांना अडवूंन चौकशी केली असता सदर प्रकार उघड झाला. यानंतर पोलिसांनी सर्व मजुरांना क्वारंटाईन करण्यात आले.
सोमवार १३ एप्रिल रोजी नाशिक येथून मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेले १९ मजूर पायी पायी त्यांच्या घरी कटनी येथे जात होते. मात्र, ते जेव्हा जळगाव शहरात आले असता पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना राधाकुष्ण मंगल कार्यालयात क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली. पटेल यांनी पुढे सांगितले की, हे मजूर सकाळी नाशिक येथून निघाले होते. नाकाबंदी करीत असतांना त्यांना हे मजूर आढळून आलेत. त्यांना सॅनिटाईझ व्हॅनद्वारे निर्जंतुक करण्यात आले. यानंतर त्यांना खाण्यासाठी फळे देऊन पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/598227050794572