Home Cities धरणगाव संचारबंदी : धरणगाव येथे गरजुंना अन्न वाटप

संचारबंदी : धरणगाव येथे गरजुंना अन्न वाटप

0
40

धरणगाव, प्रतिनिधी । येथे आज शहरातील ठीक ठिकाणी ललित वाणी व गुलाब मराठे, मराठे गल्ली मित्र परीवार यांच्यातर्फे रेल्वे स्टेशन जवळील गरजुंना अन्नदान करण्यात आले.

देशात संचारबंदीमुळे लागू करण्यात आली असल्याने गरीबांना अन्न मिळत नाही. धरणगाव शहरात देखील येथील गरीब लोकांना रोजगार नसल्याने त्यांना उपाशीच राहावे लागत आहे. गरीबांची ही अडचण लक्षांत घेऊन ललित वाणी व गुलाब मराठे तसेच मराठे गल्ली मित्र परीवार यांच्यातर्फे रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना अन्न वाटप करण्यात आले. याप्रसंगी चंदू मराठे, दुर्गश ठाकुर, योगेश मराठे, राहुल पवार, टोनी महाजन, शेखरभाऊ पाटील, विशाल पवार, भास्करभाऊ मराठे, चंदू पाटील, सुनिल चौधरी, रवी महाजन, नितिन चौधरी व मित्र परीवार उपस्थित होते.


Protected Content

Play sound