यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळा तसेच आदर्श विद्यालय या माध्यमिक शाळेत त्यांना मिळणाऱ्या अल्प आहार धान्याचे वितरण आज संस्थेचे चेअरमन पोलीस पाटील मुख्याध्यापक यांचे हस्ते करण्यात आले.
धान्य वितरिण सोशल डिस्टन्स ठेवून शिस्तीने विद्यार्थ्यांना करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत, आदर्श विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या एकूण ४८७ विद्यार्थ्यांना या धान्याचा लाभ मिळाला. यात तूर, मसूर, मटकी व मठ या प्रत्येकी ७५ ग्रॅम तर तांदूळ चार किलो याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आले. याप्रसंगी आदर्श विद्यालयाचे चेअरमन सुरेश देवराम पाटील, पोलीस पाटील संतोष जिवराम पाटील, संचालक राजाराम महाजन, मुख्याध्यापक शालिग्राम चौधरी, पर्यवेक्षक गोकुळ पाटील व सर्व व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक वैशाली पाटील, पोलीस पाटील संतोष पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललित पाटील, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, हेमंत सोनवणे, किरण अडकमोल उपस्थित होते. तसेच उपशिक्षक शालिनी महाजन, नटराज शिरसाठ, पुनम भोळे, दिपाली वाघुळदे, आसिफ तडवी, धीरज तायडे, सावखेडा सिम शालेय समिती अध्यक्ष कलिमा कुरबान तडवी, माजी उपसरपंच शाकीर तडवी, मुख्याध्यापक सलीम तडवी, नामदेव सूर्यवंशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत शिपाई गणेश पाटील पंकज बडगुजर पोलीस पाटील तडवी आदी उपस्थित होते.