Home धर्म-समाज संचारबंदी : गोरगरिबाच्या मदतीसाठी सरसावली मुंबईची खाकीवर्दी

संचारबंदी : गोरगरिबाच्या मदतीसाठी सरसावली मुंबईची खाकीवर्दी

0
28


भुसावळ, प्रतिनिधी । येथे स्पेशल रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी तळ हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून खाकी वर्दीत ही माणुसकी असल्याचे दाखवून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

लॉक डाउनमुळे तळ हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. भुसावळ शहरातील यावल रोडवर दगड फोडून पाटा-वरवंटा बनविणाऱ्या गोरगरीब समाजाला दोन वेळेचे जेवण मिळणे मुश्कील झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी मुंबई येथुन भुसावळला बंदोबस्तासाठी आलेल्या स्पेशल रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी गोरगरिबांच्या वस्तीमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले.


Protected Content

Play sound