संचारबंदी : “उजाड कुसूंबा” गावातील गरजुंना जेवण वाटप

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेतर्फे गोरगरिबांना सध्या दररोज जेवण वाटप करण्यात येत आहे. आज शुक्रवार ३ एप्रिल रोजी ” उजाड कुसूंबा ” शहरा पासुन १० ते १५ किमी हे गाव असून येथे तब्बल २०० ते २५० नागरिकांना पाकिटमध्ये शिस्तबद्धरित्या वितरण करण्यात आले.

उजाड कुसूंबा ह्या गावात बहुतांश हातमजुरी करणारे कुटुंब आहेत. लाँकडाऊनमुळे त्याच्या हाताला काम नाही. अश्या परिस्थितीत उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेने अश्या ह्या डोंगराळ भागातील गावात जाऊन अन्नदान केले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार निलेश अजमेरा, जळगाव जिल्हा अध्यक्ष हितेश पाटील, शहर अध्यक्ष हर्षल मावळे, जिल्हा उपअध्यक्ष अजय पाटील, जिल्हा कार्यअध्यक्ष अमिन शेख, जिल्हा संघटक प्रमुख मनोज पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख हारुनभाई पठाण, शहर कार्यअध्यक्ष सिध्दीक खाटिक तसेच संघटनेचे सभासद फिरोजभाई, मनोज भाऊ,महेश भाऊ व सदस्य उपस्थित होते.

Protected Content