भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दि. ४ एप्रिल रोजी आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत बाजार पेठ पोलीस स्टेशनला कोरोना संदर्भात दैनंदिन आढावा बैठक घेण्यात आली.
प्रशासन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच कुठल्या उपाय योजना केल्या पाहिजे यासाठी आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत दैनंदिन आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दिपक धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, नगर परिषद मुख्याधिकारी करुणा डहाळे तसेच न. पा. अधिकारी, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, भाजीपाला बाजाराच्या लिलावासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. दैनंदिन बाजार पाच ठिकाणी भरविण्यात आलेला आहे. गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन वेळोवेळी दक्षता घेत आहे. परिसरात सॅनेटायझरची नगरपरिषदेव्दारे फवारणी केली जात आहे. सोशल डिस्टंन्सीचा वापर करण्याच्या सूचना स्पीकरद्वारे दिल्या जात आहे. शहरात कुठेही जमाव होणार नाही यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत आहेत. जागोजागी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहे. वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी काशिनाथ सुरळकर व कर्मचारी शहरात वाहनाने पेट्रोलिंग करून संचारबंदीत विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर कलम १८८ प्रमाणे कारवाई केली जात आहे. शहरात राष्ट्रीय मार्गावर गांधी पुतळ्याजवळ नाकाबंदी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर जाण्यास बंदी घालण्यास आलेली आहे. तालुका पोलीस स्टेशनला हातभट्टी विक्रेत्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशन कारवाईच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे.