यावल, प्रतिनिधी। येथे शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या आपात्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक सुरक्षित रहावे याकरिता अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या संकटसमयीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पोलीस सेवेतील अधिकारी व पोलीस कर्मचार्यांना यावल शहर व परिसरातील पत्रकार बांधवांना सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले.
शुक्रवारी येथील पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक सुनिता कोळकर ,उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार संजय तायडे ,सुनील तायडे व सर्व कर्मचारी, होमगार्ड यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अॅड. राजेश गडे,धनंजय बारी, हर्षल मोरे,जयवंत माळी ,ईश्वर चौधरी ,ज्ञानदेव मराठे, सतीश मोरे यांच्या हस्ते सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. वृत्त संकलनासाठी पत्रकार बांधवांना ही बाहेर फिरावे लागते.सामाजिक कार्यात यांचाही मोठा वाटा असल्याने संघाच्या वतीने पोलीस स्थानक आवारात उपस्थित पत्रकार बांधवांना वाटप करण्यात आलित याप्रसंगी पत्रकार डी. बी. पाटील, अय्युब पटेल, शेखर पटेल, ज्ञानदेव मराठे, तेजस यावलकर आदि याप्रसंगी उपस्थित होते