नागपूर (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (२२ मार्चला) सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा उद्या सुरूच राहणार आहेत. फक्त संघाच्या शाखांची वेळ बदलण्यात येणार असल्याची माहिती संघाने ट्विटरवरुन दिली आहे.
संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हवाल्याने एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात रविवारी होऊ घातलेला जनता कर्फ्यू पाहता, सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री साडे नऊच्या नंतर शाखा सुरू होईल, असे संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे. माननीय पंतप्रधानांचं २२ मार्चचं जनता कर्फ्यूचं आवाहन लक्षात घेता त्या दिवशी शाखा सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री ९.३० च्या नंतर होतील,असे ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
माननीय प्रधानमंत्री जी के 22मार्च के जनता कर्फ्यु के आवाह्न को ध्यान में रख कर शाखायें उस दिन प्रात:6.30से पहले या रात्रि 9.30बजे के बाद लगेंगी।अपने-अपने क्षेत्र,मोहल्ला या सोसायटी में सुविधानुसार कुछ स्वयंसेवक एकत्र होकर भी प्रार्थना कर सकते हैं।-सरकार्यवाह, सुरेश (भय्याजी) जोशी pic.twitter.com/J5PBJcRQv7
— RSS (@RSSorg) March 21, 2020