घाबरू नका, मात्र काळजी घ्या- पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली वृत्तसंस्था । उद्या पाळण्यात येणार्‍या जनता कर्फ्यूच्या संदर्भात नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसली तरी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू पाळण्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने त्यांनी आज ट्विटच्या माध्यमातून नागरिकांना काही सूचना केल्या आहेत. ”केवळ घरात राहणंच गरजेचं नाही तर तुम्ही ज्या शहरात, ज्या भागात असाल तिथंच राहणं आवश्यक आहे. अनावश्यक प्रवासामुळे ना तुम्हाला मदत होईल ना इतरांना. आपल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाचा परिणाम मात्र मोठा असेल”, असे पंतप्रधान मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, ”डॉक्टरांनी आणि अधिकार्‍यांनी केलेल्या सूचनांचं पालन करा. ज्या नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितलं आहे त्यांना निर्देशांचं पालन करण्याची मी विनंती करतो. तुमच्यासोबतचं तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रमंडळी यामुळे सुरक्षित राहतील” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Protected Content