संकटासोबत कोरोना भारतासाठी एक संधीच : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोविड १० हा साथीच्या आजार एक मोठं आव्हान आहे, परंतु सोबतच ही एक संधीही आहे. आपण आपले वैज्ञानिक, इंजिनिअर्स आणि डेटा एक्सपर्टस अभिनव पद्धतीने काम करत या संकटावर उपाय शोधून काढण्यासाठी एकत्र आणण्याची गरज आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

 

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, कोरोनासारखी जागतिक महामारी हे एक मोठं आव्हान आहे, परंतू ही तर एक संधी आहे. संकटाच्या काळात आवश्यक असलेल्या नावीन्यपूर्ण उपायांवर काम करण्यासाठी आपल्या वैज्ञानिक, अभियंता आणि डेटा तज्ज्ञांच्या विशाल समुदाय वाढवण्याची आवश्यकता आहे. भारतात करोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याची स्थिती दिसते. संपूर्ण देशात आत्तापर्यंत १४ हजारांहूनन अधिक रुग्ण आढळले आहेत तर जवळपास ५०० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दरम्यान राहुल गांधी यांनी एक आशादायक आणि सकारात्मक ट्विट केले आहे. करोना व्हायरसने भारताला आपल्या तज्ज्ञांच्या मदतीने अभिनव उपायांद्वारे या आजाराशी लढण्याची एक संधी दिली, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Protected Content