श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “ग्रीन डे” साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे “ग्रीन डे” साजरा करण्यात आला.  यानिमित्ताने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

 

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे “ग्रीन डे” कार्यक्रमात सर्व मुले हिरव्या कपड्यात शाळेत आली. मुलांना हिरव्या रंगाचे महत्व सांगण्यात आले. मुलांना पर्यावरणाची माहिती सांगण्यात आली. निरोगी राहण्यासाठी हिरव्या भाज्या का  खाव्यात याबद्दल माहिती  शाळेच्या मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी मुलांना दिली.

पर्यावरणासाठी रोपटे लावण्यासाठी संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मुलांनी ढोल ताशाच्या तालावर जल्लोष करीत ग्रीनव डे साजरा केला.कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी केले.  स्वाती नाईक, आम्रपाली शिरसाट, सोनाली चौधरी, प्रियंका जोगी, सोनाली जाधव,  पुनम निकम,  मेघा सोनवणे, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे आदींनी सहकार्य केले.

Protected Content