एरंडोल प्रतिनिधी । येथील आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची श्री राजपूत करणी सेनेच्या खान्देश सल्लागार पदी निवड करण्यात आली.
जितेंद्र पाटील हे मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमधून गरीब व गरजू रुग्णांना मोफत किंवा अल्पदरात शस्त्रक्रिया करून देतात, शस्त्रक्रिया करून देण्याचे कार्य गेल्या पाच वर्षापासून ते अविरतपणे करता आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईसारख्या शहरातील अत्याधुनिक व अद्यवावत वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे राबवतात व गरीब व गरजू रुग्णांना रोग मुक्त करण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र पाटील यांना आतापर्यंत शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले असून त्यात तीन पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्टीत पुरस्कार समजले जातात. आरोग्य सेवेतील या त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांची या पदी निवड करण्यात आली. यामुळे एका उचित व्यक्तींची निवड व सन्मान झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून केलेले जात आहे.