श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्याचे थकित वेतन देण्याची मागणी

भुसावळ प्रतिनिधी । श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचे थकित वेतन त्वरीत द्यावे अशी मागणी नगरसेवक दीपक धांडे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

भुसावळ विभागात श्रावण बाळ योजनेतील एकूण लाभार्थी २६४८ आहे. त्यातील एस.सी. कोठ्यातील लाभार्थी सख्या ४८२ असून एस.टी. लाभार्थी सख्या ७८ इतकी आहे. जनरल श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी सख्या २०८८ असून एस.सी. व एस.टी. लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचे अनुदान मिळालेले आहे. परंतु जनरल कोट्यातील २०८८ लाभार्थीना आजपर्यंत फेबरुवारी व मार्चपर्यंतचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ लाभार्थी रोज बँकेत जाऊन लांब लांब रांगेत दोन ते तीन घंटे उभे राहत आहे. बँकेत अनुदान न जमा झाल्याने पुन्हा आपल्या नशिबाला दोष देऊन घरी येत आहे. श्रावण बाळ योजनेतील ऑफिसमध्ये विचारणा केली असता तेथील अधिकारी राज्य सरकारचा श्रावण बाळ योजनेतील २०८८ लाभार्थ्यांच्या ३९ लाख २७ हजार २०० रू निधी आला नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नगरसेवक दीपक धांडे यांनी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

Protected Content