Home धर्म-समाज शैलेश कुलकर्णी यांच्या कलाकृतीची राज्यस्तरावर निवड

शैलेश कुलकर्णी यांच्या कलाकृतीची राज्यस्तरावर निवड

0
28

पाचोरा, – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील चित्रकार, रांगोळीकार, व निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील कलाशिक्षक शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या चित्राची राज्यस्तरीय राज्य वार्षिक कला प्रदर्शनात व्यावसायिक गटातून निवड झाली आहे. या संबधीचा ई-मेल त्यांना नुकताच प्राप्त झाला आहे.

 

कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांच्या द टॉप व्ह्यु – जर्नी ऑफ व्हीलेज या शीर्षकाखालील जलरंग अपारदर्शक या माध्यमातील चित्राची 61 वें महाराष्ट्र राज्य वार्षिक कला प्रदर्शन 2021-22 (राज्यस्तरीय) यासाठी व्यावसायिक गटातून त्यांची सर्वप्रथम च निवड झाली आहे. यापूर्वी देखील राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये शैलेश कुलकर्णी यांच्या कलाकृतींची निवड झालेली आहे. त्यांच्या चित्राची राज्यस्तरावर निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिंनदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound